Maratha Vs OBC Beed : मराठा-ओबीसी वादात बीडने काय गमावलं?
Continues below advertisement
Maratha Vs OBC Beed : मराठा-ओबीसी वादात बीडने काय गमावलं?
ओबीसीच्या प्रश्नावर राज्यातील 50 तालुक्यात सभा आणि बैठका घेतल्या जाणार आहेत. तर वेळप्रसंगी सर्व ओबीसीची एकजूट करून ओबीसी समाज आझाद मैदानावर दाखल होईल असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला. आष्टी तालुक्यातील हातोला गावात आघाव कुटुंबांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहास हाके यांनी भेट देत ओबीसीच्या प्रश्नावर ग्रामस्थांशी चर्चा केली. 288 आमदारांनी एक कार्ड तयार करून ओबीसी समाज बांधवांच्या प्रश्नावर किती बोललात? हे सांगावं असं आवाहन केलं आहे. आज मनोज जरांगे पाटील यांना सर्व आजी-माजी आमदार खासदार पाठिंबा देत आहेत. तर तुम्ही कोणाचे 288 आमदार पाडणार आहात? असा सवाल हाके यांनी यावेळी उपस्थित केला. ओबीसीचे आरक्षण संपवणाऱ्याला तुम्ही निवडून देणार आहात का?
Continues below advertisement