Sarathi Organization | मराठा समाजासाठी स्थापन केलेल्या 'सारथी' संस्थेला पुन्हा स्वायत्तता बहाल!
मराठा समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या 'सारथी' संस्थेला अखेर स्वायत्ता देण्यात आली आहे. याआधी सारथी संस्थेला स्वायत्ता देण्यात आली होती. मात्र, 21 नोव्हेंबर 2019 ला 'सारथी'ची स्वायत्तता काढून घेण्यात आली होती. त्यामुळे मराठी समाजातून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. याप्रकरणी मराठा क्रांती मोर्चाने आंदोलनाचा इशाराही दिला होता. आता गरज प्रत्यक्ष कृतीची अन्यथा पुन्हा संघर्ष अटळ आहे, असे मराठा क्रांती मोर्चाने स्पष्ट केले होते. आता राज्य सरकारने पुन्हा 'सारथी'ला स्वायता बहाल केली आहे. त्यामुळे मराठा समाजाकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.
Tags :
Sarathi Organization Sarathi Sanstha Chief Minister Uddhav Thackeray Maratha Samaj Thackeray Government Maratha Reservation Maharashtra