Maratha Reservationच्या निकालानंतर 102व्या घटनादुरुस्ती विधेयकात केंद्र सरकार बदल करणार ABP Majha
मराठा आरक्षणाच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची बातमी. मराठा आरक्षणाच्या निकालानंतर 102व्या घटनादुरुस्ती विधेयकात केंद्र सरकार बदल करणार आहे. नव्या बदलांना आजच्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी मिळणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालात 102 व्या घटना दुरुस्तीनंतर एसीईबीसी नवे प्रवर्ग निर्माण करण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारलाच आहे असे म्हटले आहे. विधेयकात बदल करून केंद्र हा अधिकार आता राज्य सरकारांना ही देणार आहे.