Maratha-OBC : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर Vijay Wadettiwar यांचा यू-टर्न?, जुना व्हिडिओ व्हायरल
Continues below advertisement
राज्यात मराठा (Maratha) आणि ओबीसी (OBC) आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असून, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यात नवा वाद पेटला आहे. 'जरांगे दहा वेळा सरड्यासारखी भूमिका बदलतो,' अशी थेट टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. सप्टेंबर २०२३ मधील वडेट्टीवारांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने या वादाला तोंड फुटले आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण देण्याचे समर्थन केले होते. यावरून त्यांच्या भूमिकेत बदल झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, आपण आपल्या भूमिकेवर ठाम असून ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना आरक्षण द्यावे आणि आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा वाढवावी, असे स्पष्टीकरण वडेट्टीवार यांनी दिले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement