Maratha Protest | जरांगे पाटलांचं मुंबई आंदोलन, विखे पाटील, बावनकुळे यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
चर्चा करूनच आरक्षणाच्या मुद्द्यावर योग्य मार्ग निघू शकतो, अशी भूमिका घेण्यात आली आहे. मराठा समाजाला मजबूत करण्यासाठी सरकारने EWS चे दहा टक्के आरक्षण आणि सारथी सारख्या योजना राबवल्या आहेत. काँग्रेसचे राहुल गांधी OBC च्या बाजूने बोलतात, पण OBC मधून आरक्षण द्यायचे का, यावर त्यांची भूमिका स्पष्ट नाही. मराठा समाजाला न्याय देताना OBC वर अन्याय होऊ नये आणि OBC ला न्याय देताना मराठा समाजावर अन्याय होऊ नये, ही सरकारची भूमिका आहे. चुकीच्या आणि असंवैधानिक मागण्यांना सरकार झुकणार नाही. जर सरकारने अशा मागण्या मान्य केल्या, तर OBC समाज यापेक्षा मोठे आंदोलन मुंबई किंवा इतर कोणत्याही शहरात करू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. पुढच्या काळातही मराठा समाजाला मजबूत करण्याचे काम सरकार करेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement