Maratha Reservation Protest Nashik : मराठा-ओबीसी समाजामध्ये वितुष्ट नको ; छगन भुजबळ

Continues below advertisement

नाशिक : खासदार संभाजीराजेंच्या उपस्थितीत नाशिकमध्ये मूक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मराठा मूक आंदोलनासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 20 अधिकारी आणि 150 कर्मचारी आंदोलनस्थळी तैनात असून आंदोलनावर नजर ठेवणार आहेत. ज्या ठिकाणी आंदोलन पार पडणार आहे तिथे प्रवेशद्वारावरच बैरिकेटींग करण्यात आले असून येणाऱ्या आन्दोलकांची तपासणी केली जात आहे. आंदोलन मूक असल्यानं कोणीही घोषणाबाजी करू नये आशा स्पष्ट सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. या आंदोलनाला नाशिकमधील सर्व लोकप्रतिनिधींना हजेरी लावली. यावेळी प्रत्येक आमदार-खासदारांनी आपली भूमिका मांडली. 

छत्रपती संभाजी राजे बरोबर बोलणे झाले, मी येणार तेव्हाच सांगितले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमच्या पक्षाची भूमिका सुरवातीपासून आहे, इतर पक्षाची देखील हीच भूमिका आहे. आणि याच भूमिकेबरोबर मी एकनिष्ठ आहे.  ओबीसी आक्रोश मोर्चे मराठा समाजाला उत्तर नाही, दोन्ही समाज उपेक्षित असल्याचं पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बोलून दाखवलं. काही लोक ओबीसी आणि मराठा समाज यांच्यात वितुष्ट आणण्याचे प्रयत्न करतात ते योग्य नसल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram