Maratha Reservation : मराठा- ओबीसी आरक्षणाबद्दल कोणाची काय भूमिका ?
Maratha Reservation : मराठा आरक्षणाबद्दल कोणाची काय भूमिका ? मराठा समाजाच्या मागण्यांसाठी अण्णासाहेब पाटील यांच्यापासून अनेक नेत्यांनी आंदोलने केली, बलिदान दिले. अनेक नेत्यांनी प्रचंड काम केले, अभ्यास करून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. तुमच्या एका भूमिकेवर विषय मांडला तर मराठा समाजाचा अपमान कसा काय होतो. मराठा समाजाने सातबारा तुमच्या नावावर केलाय का? असा सवाल भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना विचारला. एका आंदोलनाच्या यशामुळे डोक्यात हवा जाऊ देऊ नका दरेकर म्हणाले की, जरांगे यांनी सबुरीने घेण्याची गरज आहे. तुम्ही मॅनेज होत नाहीत हिच तुमची ताकद, सामर्थ्य आहे. हे मराठा समाजाला माहित आहे. म्हणून समाज आपल्या पाठीशी उभा आहे. पण तुम्हाला कुणी काही बोललं तर त्याला शिवराळ भाषा, एकेरी, हमरीतुमरी बंद केले पाहिजे. स्वतःची वक्तव्य मुजोरपणासारखी वाटतात आणि दुसऱ्याला मुजोरडा, माजोरडा बोलायचे. एका आंदोलनाच्या यशामुळे डोक्यात हवा जाऊ देऊ नका. राजकारण करण्यापेक्षा समाजाच्या प्रश्नांचे नेतृत्व करा. सरकार मराठा समाजासाठी काय करतंय ते कालच्या कार्यक्रमात आम्ही दाखवले. मराठा समाजासाठी ज्यांनी पहिले बलिदान दिले ते अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांनी पुस्तिका तयार केली आणि एक लाख बेरोजगार मराठा तरुणांना उद्योजक बनवले तेही जाहीर केले.