Manoj Jarange Patil : मनोज जरांगेच्या शिवराळ भाषेवरून भाजपचा हल्लाबोल

Continues below advertisement
मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधील डीजे बंदीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. या टीकेदरम्यान जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या आईबद्दल अपशब्द वापरले. यावरून आता भाजपच्या नेत्यांनी जरांगे पाटील यांना लक्ष्य केले आहे. नितेश राणे यांनी जरांगे पाटील यांना इशारा दिला आहे की, "जर जरांगे यांनी फडणवीसांबद्दल अपशब्द काढला तर त्यांची जीभ हातात काढून देण्याचा इशारासुद्धा नितेश राणे यांनी दिला आहे." मुंबई उच्च न्यायालयाने डीजेवर बंदी घातली होती. जरांगे पाटील यांच्यावर व्यक्तिगत द्वेषाने मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केल्याचा आरोप आहे. एका बाजूला शरद पवारांचे गुणगान करायचे आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांना आईवरून शिव्या द्यायचे, हे योग्य नाही असे म्हटले जात आहे. ज्या शरद पवारांनी अनेक वर्षे आरक्षण दिले नाही, त्यांचे नाव का घेतले जात नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. निवडणुकी आल्या की आरक्षणाचे राजकीय भांडवल केले जाते, असा आरोपही करण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला पहिल्यांदा मराठा समाजाचे आरक्षण दिले, तर शरद पवार साहेब सरकारमध्ये असताना त्यांनी मराठा समाजासाठी आरक्षण दिले नाही, असेही नमूद करण्यात आले. मराठा समाज आणि महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola