Maratha Reservation | साष्ट पिंपळगावच्या ग्रामस्थांचा एल्गार; बैलगाडी आणि ट्रॅक्टरचा भव्य मोर्चा
जालना जिल्ह्यातील साष्ट पिंपळगाव येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आजपासून राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरुवात झाली आहे. या आंदोलनात हजारो महिला पुरुष आंदोलक सहभागी झाले असून, गावात बैलगाडी ,ट्रॅक्टर आणि मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत हजारो गावकरी सहभागी झाले आहेत.