Maratha Reservation : मराठा आरक्षणावरुन संभाजीराजेंची किल्ले रायगडावरुन आंदोलनाची हाक
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaratha Reservation : 16 जूनपासून मराठा समाजाच्या आंदोलनाला सुरुवात : खासदार संभाजीराजे छत्रपती
राजसदरेवरुन बोलतोय, तुम्ही समाजाचा खेळ केला तर आम्ही गप्प बसणार नाही. मी संयमी आहे, आजपर्यंत सहन केलं पण आता मी गप्प बसणार नाही, काय होईल ते होईल असं सांगत संभाजीराजे छत्रपतींनी मराठा समाजाला आंदोलनाची हाक दिली आहे. येत्या 16 जून पासून राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीपासून मराठा समाजाच्या आंदोलनाला सुरुवात होईल असं संभाजीराजे म्हणाले. रायगडवरील शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यावर संभाजीराजेंनी आपली भूमिका मांडली. देशातील लोकांना पहिलं स्वातंत्र्य हे शिवरायांनी मिळवून दिलं. त्यामुळे शिवराज्याभिषेक सोहळा हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करावा अशी मागणी संभाजीराजे छत्रपतींनी केली. रायगड किल्ल्याचं संवर्धन चांगल्या प्रकारे सुरु असल्याचं संभाजीराजे यांनी सांगितलं.
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सुमारे 350 वर्षांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 'सुवर्ण होनांनी' अभिषेक करण्यात आला आहे. यावेळी संभाजीराजे छत्रपतींनी हा आपल्यासाठी आणि राज्यासाठी एक सुवर्ण क्षण असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. शिवरायांचे हे होन देशातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन त्यांनी शिवभक्तांना केलं.