Maharashtra Superfast News :महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 30 August 2025

मुंबईतील आझाद मैदानात निवृत्त न्यायमूर्ती शिंदेंनी मनोज जरांगेंची भेट घेतली. मराठवाड्यात सत्तेचाळीस हजार नोंदी मिळाल्या असून दोन लाखाहून अधिक प्रमाणपत्रे दिल्याची माहिती न्यायमूर्ती शिंदेंनी जरांगेंना दिली. मात्र, मराठवाड्यातील एक लाख तेवीस हजार कुणबी गेले कुठे, असा सवाल मनोज जरांगेंनी शिंदे समितीला केला. मराठा समाजाला कुणबी घोषित केल्याशिवाय हटणार नसल्याचे जरांगेंनी स्पष्ट केले. "मला एवढं माहिती तेरा महिने झालाय अभ्यास करतंय शिंदे समिती. शिंदे समितीचा अभ्यास संपलेला आहे. सरकार नाटक करतंय. याची डायरेक्ट मंजुरी अंबलबजावणीच पाहिजे," असे जरांगेंनी म्हटले. हैदराबाद गॅझेटिअरला तत्वतः मान्यता दिल्याचे न्यायमूर्ती शिंदेंनी सांगितले. मंत्रिमंडळासमोर ही माहिती ठेवली जाईल. घटनेत बदल करण्याची भूमिका घेतली तरच आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो, असे शरद पवारांनी म्हटले. तमिळनाडूत बहात्तर टक्के आरक्षण मिळू शकते, तर घटनेत बदल करता येऊ शकतो, असा सल्ला पवारांनी दिला. मनोज जरांगे हा शब्द शरद पवारांचा सुसाइड बॉम्बर असा मोठा दावा भाजपा आमदार संजय केनेकर यांनी केला. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मराठा आंदोलकांचा ढेकूण असा उल्लेख केल्याने भाजपाचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी टीका केली. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी सोमवारपासून आंतरवलीत ओबीसी समाज आंदोलन करणार असल्याची माहिती दिली. आंदोलकांना भर रस्त्यावर स्नान करावे लागले तर मराठा आंदोलकांनीच नाश्त्याची सोय केली. मुंबई पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola