Maratha Reservation : मोठी बातमी! मराठा आरक्षणाबाबत शिंदे समितीचा अहवाल राज्य सरकारनं स्वीकारला
Maratha Reservation : मोठी बातमी! मराठा आरक्षणाबाबत शिंदे समितीचा अहवाल राज्य सरकारनं स्वीकारला
मराठा आरक्षणाबाबत 54 लाख पुरावे असलेला शिंदे समितीचा दुसरा, तिसरा अहवाल स्वीकारला, विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं नेमलेल्या शिंदे समितीचा अहवाल राज्य सरकारनं स्वीकारलाय... हा अहवाल एबीपी माझाच्या हाती लागलाय.. शिंदे समितीच्या अहवालात सापडलेल्या पुराव्यांची संख्या ५४ लाख ८१ हजार ४०० इतकी आहे... सार्वजनिक दस्तावेजात कुणबी, कुणबी मराठा आणि मराठा कुणबीचे पुरावे सापडल्याचं शिंदे समितीच्या अहवालात नमूद करण्यात आलंय...
शिंदे समितीच्या अहवालात काय काय?
सार्वजनिक दस्तावेजात कुणबी,कुणबी मराठा,मराठा कुणबी या जातींचे पुरावे सापडले
सापडलेल्या पुराव्यांची संख्या ५४ लाख ८१ हजार ४००
१९८६-ऑक्टो २०२३ दरम्यान ३७,४६,१४२ प्रमाणपत्रं वितरीत
२४ ऑक्टो २०१३ नंतर ४३,९७४ प्रमाणपत्रं वितरीत
-------------
१९८६-ऑक्टो २०२३ दरम्यान वितरीत प्रमाणपत्रं
कुणबी
३७,४३,५०१
कुणबी मराठा
२८१
मराठा कुणबी
२,३६०
-----------
२४ ऑक्टोबर २०२४ पासून वितरीत प्रमाणपत्रं
कुणबी
४५,८५६
कुणबी मराठा
६१७
मराठा कुणबी
५०१
---------------