
Maratha Reservation LIVE Update : मराठा समाजाची लोकसंख्या 27 टक्के, मागासवर्ग आयोगाचा अहवाल
Continues below advertisement
Maratha Reservation LIVE Update : मराठा समाजाची लोकसंख्या 27 टक्के, मागासवर्ग आयोगाचा अहवाल मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विधिमंडळाचं एक दिवसाचं विशेष अधिवेशन आज मंगळवारी पार पडणार आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाचं विधेयक मांडलं जाणार आहे. या विधेयकावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत चर्चा होऊन चर्चेअंती हे विधेयक मंजूर केलं जाईल. आज मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. त्यामध्ये मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला मंजूरी मिळेल. पण या अहवालात नेमकं काय असेल, याबाबतची उत्सुकता लागली आहे.
Continues below advertisement