Maratha Reservation | मराठा आरक्षणावर पुढील सुनावणी 4 ऑक्टोबरला, 'मागास नाही' युक्तिवाद
मराठा SEBC आरक्षणावरील पुढील सुनावणी आता चार ऑक्टोबरला होणार आहे. अॅडव्होकेट Pradeep Sancheti यांनी मराठा समाज मागासवर्गीय नाही असा युक्तिवाद कोर्टात केलेला आहे. Sancheti यांनी कोर्टामध्ये याचा सगळा डेटादेखील दाखल केलेला आहे. अनेक मराठा श्रीमंत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत असे Sancheti यांनी म्हटले आहे. मराठा समाजातील अनेकांकडे पक्की घरं आणि Flats देखील आहेत असा युक्तिवाद Sancheti यांनी केलेला आहे. आजच्या सुनावणीमध्ये शैक्षणिकदृष्ट्या मराठा समाज मागास आहे की नाही यावरती युक्तिवाद झालेला आहे. महाधिवक्तांनी सरकारतर्फे आज बाजू कोर्टामध्ये मांडलेली आहे. चार ऑक्टोबरला सामाजिकरीत्या मराठा समाज कसा मागास आहे या संदर्भातली ही सुनावणी होणार आहे. पुढील सुनावणीमध्ये आर्थिक आणि सामाजिक या प्रवर्गात मराठा समाज कसा मागास आहे यावरती युक्तिवाद होणार आहे.