Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी तपासले जाणारे निजामकालीन अभिलेख 'माझा'वर EXCLUSIVE
Continues below advertisement
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड महिन्यापासून महसूल प्रशासनाच्या वतीने कुणबी असलेल्या नोंदीचे अभिलेख तपासण्यात येत आहेत. यामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या ४५ दिवसांत ६५ लाख अभिलेख मराठवाड्यात तपासण्यात आले. त्यात केवळ ५ हजार कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या आहेत. तहसील कार्यालय, अभिलेख कार्यालय, शाळा, इतर सर्व कार्यालयं तसेच जेलमधील नोंदीदेखील तपासण्यात येत आहेत. मात्र निजाम काळात उर्दू भाषेच्या प्रभावामुळे कुणबी नोंदी करण्यात अनास्था असल्याने नोंदी कमी झाल्या आहेत, असं शासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं.
Continues below advertisement