Maratha Reservation Gaon Bandi:आरक्षणासाठी गावबंदी,नेत्यांची नाकाबंदी;आत्तापर्यंत या नेत्यांना रोखलं

आधी सरकारला निवेदनं, मग महाराष्ट्रभर शांततापूर्ण मोर्चे... रास्तारोको... उपोषणं आणि कोर्टकज्जे अशा सगळ्या मार्गावरून मराठा आरक्षणाचा लढा सुरूय... या लढ्याला आता नवं स्वरूप आलंय.... आणि ते म्हणजे गावबंदीचे... महाराष्ट्रातील अनेक गावांनी नेत्यांना गावबंदी केलीय. त्यामुळे अनेक ठिकाणी नेत्यांना त्याचा फटका बसलाय तर काही ठिकाणी मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मंत्री हसन मुश्रीफ यांनाही याचा फटका बसतोय. एकीकडे मनोज जरांगे यांचं अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू असताना, महाराष्ट्रभर गावबंदीचं लोण पसरलंय.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola