Vijay Wadettiwar : ‘हा आरक्षण जिहाद, OBC च्या मानेवर सुरी चालवण्याचं काम’, वडेट्टीवार यांचा हल्लाबोल
Continues below advertisement
नागपूरमध्ये (Nagpur) झालेल्या OBC महामोर्चात बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. 'हा जिहाद ओबीसीमध्ये घुसखोरी करून ओबीसींच्या मानेवर सुरी चालविण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे,' असं वक्तव्य करत वडेट्टीवार यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. विदर्भातील कृषी सहाय्यक आणि पोलीस भरतीमधील बहुतांश जागा मराठवाड्यातील मराठा समाजाने बोगस कुणबी प्रमाणपत्रे सादर करून मिळवल्या आहेत, ज्यामुळे स्थानिक ओबीसी उमेदवार नोकरीपासून वंचित राहत आहेत, असा दावाही त्यांनी केला. आम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही, पण ओबीसींच्या हक्कावर गदा आणू देणार नाही, असेही ते म्हणाले. सरकारने वेळीच शुद्धीवर यावे, नाहीतर त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement