Maratha Quota Row | राज ठाकरे यांचे Eknath Shinde यांच्यावर सूचक विधान, Jarange Patil यांचा पलटवार
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सूचक विधान केले आहे. मागे एकनाथ शिंदे आंदोलकांना भेटण्यासाठी गेले होते आणि त्यांनी जरांगे यांना अध्यादेशाची प्रत दिली होती, अशी आठवण राज ठाकरे यांनी करून दिली. राज ठाकरे यांच्या या विधानाचा नेमका अर्थ काय, याची चर्चा सुरू झाली आहे. यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मला असं वाटतंय या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदे देऊ शकतात. मी नाही देऊ शकतो," असे जरांगे म्हणाले. एकनाथ शिंदे जेव्हा येतील, तेव्हा त्यांना मुंबईतील त्रासाबाबत विचारावे, असे जरांगे यांनी म्हटले. ते मागच्या वेळी नवी मुंबईला जाऊन प्रश्न सोडवून परत का आले, असा सवालही जरांगे यांनी केला. या सर्व प्रश्नांची उत्तरे एकनाथ शिंदे यांनी द्यावीत, असे जरांगे यांनी स्पष्ट केले. तसेच, लोकसभेला आणि विधानसभेत घडलेल्या काही राजकीय घटनांचाही उल्लेख करण्यात आला.