Maratha Protest Mumbai दुपारपर्यंत रिकामी करा, मुंबईत मराठा आंदोलनावर हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश
हायकोर्टाने राज्य सरकारला मुंबई दुपारपर्यंत रिकामी करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. मराठा आंदोलनामुळे ऐन गणेशोत्सवात मुंबईला छावणीचे स्वरूप आले आहे. आंदोलकांना दक्षिण मुंबई सोडू नये, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. तसेच, आझाद मैदान सोडून सीएसएमटी, मरीन ड्राइव्ह, हुतात्मा चौक आणि दक्षिण मुंबईतील इतर भागातून आंदोलकांना बाहेर काढण्याचे निर्देशही कोर्टाने दिले आहेत. थोड्याच वेळात पुन्हा सुनावणी होणार असून, कोर्टाने दिलेल्या आदेशांचे पालन होतेय की नाही, याची माहिती हायकोर्टात दिली जाईल. त्यामुळे आजच्या सुनावणीत काही नवीन निर्देश दिले जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 'मुंबई आज दुपारपर्यंत रिकामी करा' हा हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण आदेश आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारला कठोर पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.