Maratha Quota Row: 'भुजबळ म्हणजे ठुसका फटाका, जो वाजत नाही पण...', Manoj Jarange यांची घणाघाती टीका
Continues below advertisement
मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर विश्वास व्यक्त करतानाच, मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत हल्ला चढवला आहे. 'भुजबळ म्हणजे ठुसका फटाका, जो वाजत नाही पण सगळ्याला घराच्या बाहेर काढतो', अशा शब्दात जरांगे यांनी भुजबळांवर निशाणा साधला. फडणवीसांवर मराठा समाजाने विश्वास ठेवला आहे, तो त्यांनी कायम ठेवावा, अशी अपेक्षा जरांगे यांनी व्यक्त केली. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र तातडीने वितरित करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मतांसाठी ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाजांना खूश ठेवण्याचे राजकारण चालणार नाही, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला. ओबीसी नेत्यांकडून केवळ राजकीय फायद्यासाठी समाजाचा वापर होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement