Maratha Protester Dance : हलगीचा ताल, पावसाचा जोर, आझाद मैदानात मराठा आंदोलक थिरकले

मुंबईच्या आझाद मैदानावर (Azad Maidan) मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. मुसळधार पाऊस असूनही, आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. पावसात भिजत कार्यकर्ते घोषणाबाजी करत असून हलगीच्या तालावर नाचताना दिसत आहेत. कार्यकर्त्यांचा उत्साह कायम असून, आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. मिळेल त्या जागी आंदोलकांनी आपले बस्तान मांडले आहे. मात्र, जेवणाची आणि पाण्याची गैरसोय होत असल्याचा आरोपही आंदोलकांकडून केला जात आहे. तरीही, या अडचणींवर मात करत मराठा आंदोलक आझाद मैदानावर तळ ठोकून आहेत आणि आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांचा संघर्ष सुरूच आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola