Maratha Protest मध्य प्रदेशातील तरुण-मराठा आंदोलक;आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न,आंदोलकांचा आरोप
मुंबईतील मराठा आंदोलनात बाहेरून माणसे आणून आंदोलन बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. आंदोलनामध्ये मध्य प्रदेशातील (MP) एक तरुण घुसल्याचे आंदोलकांनी निदर्शनास आणले. या तरुणाकडे 'एक मराठा, लाख मराठा' लिहिलेला रुमाल, पाण्याची बाटली आणि खाण्याचे पदार्थ होते, जेणेकरून तो आंदोलक वाटावा. सदावर्तेंसारख्या वकिलांच्या माध्यमातून कोर्टापुढे मराठा आंदोलकांची खोटी बाजू मांडण्यासाठी हे षड्यंत्र केले जात असल्याचा दावाही करण्यात आला. आमचे आंदोलन शांतताप्रिय असून, मुंबईकरांना कोणताही त्रास होत नाही, मात्र असे घुसखोर पाठवून आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. आंदोलकांनी सरकारला विनंती केली, "जर अशा पद्धतीने घुसखोरी होत असेल आणि त्याचा डाग आमच्यावर लागत असेल, तर सर्वसामान्य मराठा माणसाने काय करायचं?" यावर सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.