Maratha Protest | Azad Maidan मध्ये पावसातही आंदोलन सुरू, मुंबईमध्ये वाहतूक कोंडी
जलान गेटच्या क्षेत्रात सकाळपासून आझाद मैदानात उपोषण सुरू आहे. मराठा आंदोलनासाठी मोठ्या संख्येने आंदोलक आझाद मैदानात दाखल झाले आहेत. मुंबईत पावसाचा जोर वाढल्यानं आंदोलक भर पावसामध्येही आझाद मैदानात बसून आहेत. पावसामुळे आझाद मैदानात सर्वत्र पाणी साचले आहे. या आंदोलनामुळे अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडी झाली होती. मुंबईतील पूर्व मुक्त मार्गावर वाहतूक संथ गतीने सुरू आहे. मुंबईत दाखल झालेल्या अनेक गाड्या परत माघारी जात आहेत. रॅपिड अॅक्शन फोर्स आणि मोठ्या पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मुंबईकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. दक्षिण मुंबईत आलेल्या सर्वसामान्य मुंबईकरांसाठी फ्रीवे उघडा करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे. अनेक मराठा आंदोलक इथे उपस्थित आहेत.