Maratha Reservation | भुजबळ आक्रमक, GR मधील 'मराठा' शब्दावर आक्षेप, OBC ना फटका बसतोय
Continues below advertisement
ओबीसी उपसमितीच्या बैठकीत छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली. सरकारने काढलेल्या जीआरमधील 'मराठा' या शब्दावर त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. मराठा समाजासाठी काढलेल्या या जीआरमुळे ओबीसी समाजाला फटका बसत असल्याचे वक्तव्य भुजबळ यांनी बैठकीत केले. "मराठा समाजासाठी काढलेल्या जीआरमुळे ओबीसींना फटका बसतोय," असे भुजबळ म्हणाले. कायद्यानुसार जातीला आरक्षण देता येते, समाजाला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे जीआरमध्ये 'कुणबी' किंवा 'ओबीसी' असा उल्लेख असायला हवा होता, अशी त्यांची मागणी आहे. हा जीआर घाईघाईने आणि दबावाखाली काढण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा झाली नाही आणि ओबीसी समितीसोबतही चर्चा झाली नाही, असे भुजबळ यांनी नमूद केले. जीआरबाबत सूचना किंवा हरकती मागवण्यात आल्या नाहीत, असेही त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे ओबीसी समाजात नाराजी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भुजबळ यांनी या जीआरला न्यायालयात आव्हान देण्याचा इशाराही दिला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement