Maratha Kranti Morcha : मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये मराठा क्रांती संघर्ष मोर्चा
मराठा आरक्षणासाठी विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली आज बीडमध्ये मराठा क्रांती संघर्ष मोर्चा काढण्यात येत आहे. प्रशासनाची कोणतीही परवानगी नसतानाही हा मोर्चा काढण्यात येत आहे. त्यामुळे या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामध्ये तीन उप विभागीय पोलीस अधिकारी, 40 पोलीस अधिकारी व चारशे पोलीस कर्मचारी यांची नजर या मोर्चावर असेल.