MarakadWadi Repolling | मारकडवाडीत मतदान मागे, नागरिकांवर पोलिसांचा दबाव, जानकरांचा आरोप

Continues below advertisement

MarakadWadi Repolling | मारकडवाडीत मतदान मागे, नागरिकांवर पोलिसांचा दबाव, जानकरांचा आरोप

बॅलेटसाठी आम्ही छातीवर बुलेट झेलू, असा निर्धार व्यक्त करत मारकडवाडी गावात मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा निर्णय अखेर ग्रामस्थांकडून मागे घेण्यात आला आहे. मारकवाडीतील बॅलेट पेपरद्वारे होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सोमवारी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही मारकडवाडी गावातील (Markadwadi Village) ग्रामस्थ मतदानप्रक्रिया राबवण्यावर ठाम होते. त्यानुसार आज सकाळी मारकडवाडी ग्रामपंचायतीबाहेर नागरिकांची जमवाजमव सुरु झाली होती. मात्र, पोलिसांनी दिलेल्या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी ग्रामस्थांशी चर्चा करुन येथील बॅलेट पेपर व्होटिंगची (Ballot Paper Voting) पक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला. यानंतर उत्तमराव जानकर (Uttam Jankar) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

आम्ही पोलिसांसोबत बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्यासाठी चर्चा केली.  त्यांनी सांगितलं की, तुम्ही एक मतदान केलं तर आम्ही मतपत्रिका आणि इतर साहित्य जप्त करु. आम्ही अगोदरच 144 कलम लागू केले आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांवर गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिसांनी उत्तमराव जानकर यांना सांगितले. यानंतर आपण ग्रामस्थांशी चर्चा केल्याचे उत्तमराव जानकर यांनी सांगितले. जर पोलीस मतदान करुन देणार नसतील तर काय फायदा? आपण पेट्या धरुन ठेवणार, ते हिसकावणार, त्यामुळे गोंधळ होऊन झटापट उडेल. यामध्ये मतदानासाठी आलेले लोक निघून जातील, असे ग्रामस्थांचे म्हणणे पडले. त्यामुळे तुर्तास आम्ही ही मतदानप्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे उत्तमराव जानकर यांनी सांगितले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram