Urban Naxalism: गडचिरोलीत ६० नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; ऐतिहासिक समर्पण
Continues below advertisement
गडचिरोलीत माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला असून, पोलिसांच्या लढ्याला मोठे यश आले आहे. माओवादी पॉलिट ब्युरो सदस्य मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ भूपती याने ६० सहकाऱ्यांसह पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. 'पुढचा चॅलेंज हा शहरी नक्षलवाद आहे, कारण हे शहरी नक्षलवादी माओवादी भारताचं संविधान मानत नाहीत. आता येत्या काळातील लढाई ही संविधान विरुद्ध शहरी माओवादी आहे, पण संविधानच जिंकेल,' असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. दक्षिण गडचिरोलीच्या जंगलात छत्तीसगड सीमेजवळ हे आत्मसमर्पण झाले, यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना संविधानाची प्रत सुपूर्द केली. भूपतीच्या आत्मसमर्पणामुळे महाराष्ट्रातून सशस्त्र माओवाद संपण्याची शक्यता निर्माण झाली असून, तथाकथित 'रेड कॉरिडॉर' संपुष्टात येण्याची ही सुरुवात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राने २०१८ मध्ये शहरी नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई केली होती, याचीही आठवण त्यांनी करून दिली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement