Mansoon Update : यावर्षी सरासरीहून अधिक पावसाचा अंदाज, सरासरीच्या 106 टक्के पाऊस? ABP Majha
Continues below advertisement
Monsoon 2024 : एकीकडे सूर्य मुंबई ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला भाजून काढतोय, अशातच दिलासा देणारी बातमी भारतीय हवामान विभागाने दिलीय. यावर्षी सरासरीहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशात सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. . हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सोमवारी (15 एप्रिल) पावसाचा अंदाज वर्तवत ही माहिती दिली. भारतीय हवामान विभागाने हा पहिला अंदाज वर्तवला आहे. यंदा मान्सून (Monsoon 2024) सामान्यपेक्षा अधिक राहणार आहे. महाराष्ट्रात देखील यंदा मान्सून चांगला राहणार आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात (Maharashtra Monsoon Update) चांगला पाऊस होईल, असं भाकीत IMD ने वर्तवलं आहे.
Continues below advertisement