Manorama Khedkar Case मनोरमा खेडकर यांना अंतरिम जामीन, Navi Mumbai पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Continues below advertisement
क्लीनर अपहरण प्रकरणी (Cleaner Abduction Case) फरार असलेल्या मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांना अंतरिम जामीन मिळाला आहे. त्या अजूनही पोलिसांना सापडलेल्या नाहीत, मात्र त्यांनी वकिलासोबत न्यायालयात हजर राहून जामीन मिळवल्याने नवी मुंबई पोलिसांच्या (Navi Mumbai Police) भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खेडकर यांच्या वकिलांनी न्यायालयात दावा केला की, गाडीच्या नुकसानीसंदर्भात चर्चा करण्यासाठी क्लीनरला घरी बोलावले होते. “क्लीनरच्या अपहरणाबाबतचे सगळे आरोप मनोरमा खेडकरनी फेटाळले” आहेत. या घडामोडीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि तपासाच्या प्रगतीवर आता संशयाचे धुके दाट झाले आहे, कारण आरोपी स्वतः न्यायालयात हजर होऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत असताना पोलीस अनभिज्ञ असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola