Manoj Jarange यांनी 288 जागांवर निवडणूक लढवावीच, मग त्यांना कळून जाईल की...तायवाडेंचा उपरोधिक टोला
Manoj Jarange यांनी 288 जागांवर निवडणूक लढवावीच, मग त्यांना कळून जाईल की...तायवाडेंचा उपरोधिक टोला
आता राज्य सरकार ने मनोज जरांगे पाटील यांना स्पष्ट सांगण्याची वेळ आली आहे... मात्र, राज्य सरकार स्पष्ट सांगत नाही, म्हणून तर अडचण आहे.. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा सूचक वक्त.... मनोज जरांगे पाटील यांनी 288 जागांवर निवडणूक लढवावीच, त्यांना लोकांचा किती पाठिंबा मिळतो हे एकदाचे स्पष्ट होऊन जाईल... राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा मनोज जरांगे पाटील यांना उपरोधिक टोला.. राज्य सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षातील नेत्यांनी जायला हवं होतं आणि आपापले मत मांडायला हवे होते, असं मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केले आहे... मराठा आरक्षणाचे मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी वेगवेगळ्या मागण्या केल्या असल्या तरी मातृसत्ताक पद्धतीने जात निश्चितीकरणाची जरांगे यांची मागणी पूर्ण करणे शक्य नाही, हे आता राज्य सरकारने जरांगे पाटील यांना स्पष्ट सांगावे अशी मागणी ही डॉ. तायवाडे यांनी केली आहे.. राज्य सरकारने तीन निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमली आहे, त्यांच्याकडून कायदेशीर मत घेऊन राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांना काय होऊ शकते आणि काय नाही होऊ शकत हे स्पष्ट सांगितले पाहिजे... मात्र मनोज जरांगे पाटील यांना सरकार स्पष्ट सांगत नाही हीच मोठी अडचण असल्याचे तायवाडे म्हणाले.. सामाजिक प्रश्नावर आंदोलन करताना लाखोंनी आणि कोटींनी लोक सोबत येतात... मात्र राजकीय प्रश्नावर लोकांची भूमिका वेगवेगळी असते.. त्यामुळे सामाजिक आंदोलनाच्या तुलनेत राजकीय लढ्यात तेवढा पाठिंबा मिळत नाही असेही तायवाडे म्हणाले... त्यामुळे *मनोज जरांगे यांनी 288 जागांवर निवडणूक लढवावीच, त्यांना एकदाचे कळून जाईल की त्यांना किती पाठिंबा मिळत आहे असा उपरोधिक टोलाही तायवाडे यांनी लगावला...