Manoj Jarange : मनोज जरांगे आजपासून पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर, कुणावर निशाणा साधणार याकडे लक्ष

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी सरकारला २४ डिसेंबपर्यंत मुदत दिलीये. त्या पार्श्वभूमीवर आजपासून मनोज जरांगे पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. मनोज जरांगे महाराष्ट्र दौऱ्यासाठी अंतरवाली सराटीतून रवाना झालेत. धाराशिवमधील परांडा आणि वाशी तालुक्यात त्यांची सभा होणार आहे तर भुम तालुक्यातील ईट येथे त्यांची दुपारी २ वाजता कॉर्नर सभा होणार आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील वांगी नंबर १ या ठिकाणी जरांगेंची भव्य सभा होणार आहे... ही सभा १२५ एकर शेतात होणार आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने या सभेची तयारी करण्यात येत आहे.. दरम्यान बीडच्या पाली गावात जरांगेंचं जंगी स्वागत केलं जातयं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola