Manoj Jarange Vs Sambhaji Bhide : फडणवीसांनी नवं अस्त्र बाहेर काढलं : मनोज जरांगे
Manoj Jarange Vs Sambhaji Bhide : फडणवीसांनी नवं अस्त्र बाहेर काढलं : मनोज जरांगे
मराठ्यांना उभा देश चालवायचा आहे, आरक्षण कुठून काढलं? असं वक्तव्य शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांनी केलंय.. भिडेंच्या या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय.. मनोज जरांगे पाटलांनीही भिडेंच्या वक्तव्याला आक्षेप घेत फडणवीसांवर टीका केलीय.. फडणवीसांनी हे नवं अस्त्र बाहेर काढलंय असं जरांगे म्हणालेत..
विशेष म्हणजे अंतरवाली सराटीतल्या लाठीचार्ज प्रकरणानंतर भिडेंनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली होती.. या भेटीत मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे अशी भूमिका भिडेंनी मांडली होती.. त्यामुळं आपल्या जुन्या भूमिकेवरुन भिडेंनी पलटी मारली की काय असा प्रश्न निर्माण झालाय..