Maratha Quota Protest | Manoj Jarange यांचा २९ ऑगस्टला Mumbai मोर्चा, आरक्षणाशिवाय माघार नाही
मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्ट रोजी समर्थकांसह जालन्याच्या अंतर्वालीतून मुंबईच्या दिशेने मराठा आरक्षणासाठी कूच करण्याचा निर्धार केला आहे. गणपती बाप्पाला घेऊनच मुंबईत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी बीडच्या मांजरसुंबा येथील सभेत सांगितले. मुंबईत पोहोचल्यावर समाजात फूट पाडण्याचा सरकारचा डाव असू शकतो, अशी शंका जरांगे यांनी व्यक्त केली. श्रीमंत मराठ्यांनी वाहनांच्या स्वरूपात मोर्चासाठी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. "आरक्षण घेतल्याशिवाय माघार घ्यायची नाही" असा चंग त्यांनी बांधला आहे. २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता अंतर्वालीतून मोर्चा निघणार आहे. मराठ्यांनी शांततेत मुंबईला जायचे आणि आरक्षण घेऊन शांततेत घरी परत यायचे असे आवाहन त्यांनी केले. दगडफेक किंवा जाळपोळ करू नये असेही त्यांनी सांगितले. बीडमधील सभेत डीजे वाजवण्यावर निर्बंध घालणाऱ्या पोलिसांवर त्यांनी टीका केली. "यापुढच्या काळात मराठ्यांनी दुसऱ्यांच्या डोक्याने नाही चालायचं. स्वतःच्याच डोक्याने चालायचं" असेही त्यांनी म्हटले.