ABP News

Manoj Jarange : उमेदवार दिला नाही तरी पाडणार! मनोज जरांगे यांच्या रडारवर धनंजय मुंडे?

Continues below advertisement

जालना : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगेंनी (Manoj Jarange)  पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं असून आज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे.  दरम्यान उपोषण स्थळी अद्याप सरकारच्या वतीनं कोणीही आलं नसल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलंय. तर यावेळी बोलतना त्यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde)  जोरदार निशाणा साधलाय .जो मराठा समाजाला त्रास देईल त्या नेत्याला विधानसभेत पाडणार असल्याचा इशारा जरांगेंनी दिला आहे. ते जालन्यात माध्यमांशी बोलत होते. 

मनोज जरांगे यांनी  माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडेंवर देखील निशाणा साधला आहे.काही जण देशी पिऊन माझ्यावर टीका करतात. त्याच्या नेत्याने त्याला आवर घालावा.  तुझा  नेता परळीत कसा निवडून येतो हे बघतोच.  ज्या जातीचा नेता मराठ्यांना त्रास देईल त्या जातीचा नेता विधानसभेला पाडणार. आमच्या लोकांना बीड माजलगाव ,केज, गेवराई बीडमध्ये  मारहाण झाली.  त्यांच्या नेत्याचे काम त्यांच्या जातीला आवाहन करावे, ते नेते परदेशात जाऊन झोपतात. तिला मी काय केलं, मी कोणाला म्हटलं पाडा म्हणून तिला, असे म्हणत पंकजा मुंडे यांचे नाव न घेता मनोज जरांगेंनी टीका केली आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram