Manoj Jarnage On Vidhan Sabha : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न दिल्यास विधानसभा लढवणार- जरांगे

Continues below advertisement

Manoj Jarnage On Vidhan Sabha : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न दिल्यास विधानसभा लढवणार- जरांगे

Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil Movie :    मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा जीवनपट उलगडून दाखवणारा "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" ( Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil ) चित्रपट पु्न्हा एकदा चर्चेत आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज लाँच करण्यात आला. अंतरवाली सराटीमधील उपोषण आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जनंतर राज्यात मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा जोमाने पेटले. "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील"  चित्रपटात या लाठीचार्जचे चित्रण आहे. या लाठीचार्जचा आदेश कोणी दिला, याचा दावा चित्रपटातून होण्याची शक्यता आहे. 

मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते अंतरवाली सराटी येथे या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. चित्रपटाच्या धमाकेदार ट्रेलरमुळे  चित्रपटाविषयी आता कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. मराठ्यांचं वादळ धडकणार चित्रपटसृष्टीत घडवणार नवा इतिहास ,अभी नही तो कभी नही, मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांची जीवनकहाणी असलेला "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" हा चित्रपट आता 14 जून 2024 ला प्रदर्शित होत आहे. अख्खा महाराष्ट्र या चित्रपटाच्या टीमने प्रमोशनसाठी पिंजून काढला असून रसिक प्रेक्षकांकडूनही या चित्रपटला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटाचा वेध "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" या चित्रपटातून घेतला जाणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram