Farmer Loan Waiver: 'सरकार मुघलांपेक्षा भयंकर', Bacchu Kadu यांच्या भूमिकेवर Jarange पाटील कडाडले
Continues below advertisement
शेतकरी कर्जमाफीच्या (Farmer Loan Waiver) मुद्द्यावरून आता मनोज जरांगे (Manoj Jarange) आणि बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. 'तुम्ही सहा महिन्यांनी कर्जमाफीचं आश्वासन देत असाल तर तोपर्यंत शेतकरी जगणारच नाही', अशी थेट टीका मनोज जरांगे यांनी केली आहे. सरकारने ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिल्यानंतर बच्चू कडू यांनी समाधान व्यक्त केलं होतं. मात्र, जरांगे यांनी सरकारच्या या भूमिकेला तीव्र विरोध केला आहे. एखाद्या रुग्णाला आता इंजेक्शनची गरज असताना तुम्ही त्याला सहा महिन्यांनी हॉस्पिटलमध्ये नेण्याची गोष्ट करत आहात, असं म्हणत त्यांनी सरकारच्या आश्वासनाला शेतकऱ्यांची फसवणूक म्हटलं आहे. सरकारने मुघलांपेक्षाही भयंकर वागणूक दिली असून, तातडीने कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement