Manoj Jarange on Chhagan Bhujbal : ओबीसीमध्ये समावेश होणाऱ्या 15 जातींना भुजबळांचा विरोध नाही का?

Manoj Jarange on Chhagan Bhujbal  : ओबीसीमध्ये समावेश होणाऱ्या 15 जातींना भुजबळांचा विरोध नाही का?

येवल्यातीन डुप्लिकेट नेते आता कुठे गायब झाले?, ओबीसीमध्ये समावेश होणाऱ्या १५ जातींना भुजबळांचा विरोध नाही का, मनोज जरांगेंचा सवाल तर आता मराठ्यांचे डोळे उघडणं गरजेचं, जरांगेंचं वक्तव्य. 

राज्य सरकारनं आणखी १५ जातींचा ओबीसींमध्ये समावेश करण्याची हालचाल सुरू केलीय. केंद्रीय मागासवर्ग आयोगानं त्याची यादी केंद्र सरकारकडे सुपूर्द केलीय. आता यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी छगन भुजबळांवर तोफ डागलीय. येवल्याचा डुप्लिकेट नेता आता कुठे गेला, आता या जातींना विरोध का नाही, असा सवाल जरांगेंनी भुजबळांना केलाय. तसंच सरकारनं या जातींना ओबीसीत घेतांना महाविकास आघाडीकडून लिहून घेतलंय का, असा खोचक सवालही त्यांनी केलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola