Manoj Jarange Shantata Rally : हिंगोलीच्या वेशीवर मनोज जरांगेंचं जोरदार स्वागत
Manoj Jarange Shantata Rally : हिंगोलीच्या वेशीवर मनोज जरांगेंचं जोरदार स्वागत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आजपासून मराठवाड्याचा दौरा सुरू करत आहेत. या दौऱ्याची सुरुवात हिंगोली जिल्ह्यापासून होणार आहे. हिंगोली (Hingoli) शहरामध्ये जनजागृती शांतता रॅली काढली जाणार आहे. दुपारी 12 वाजता ही रॅली निघणार असून काहीच वेळात मनोज जरांगे हिंगोली शहरांमध्ये दाखल होणार आहे. शहरालगत असलेल्या बळसोंड येथे मनोज जरांगे यांचं स्वागत केलं जाणार आहे. जरांगे यांच्या स्वागतासाठी तब्बल 40 फूट लांब असलेला आणि दीडशे किलो वजनाच्या गुलाब फुलांच्या तयार करण्यात आला आहे. हिंगोली शहरात रॅलीच्या पार्श्वभूमीवर भव्य तयारी जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी तब्बल 40 फूट लांब असलेला हार तयार करण्यात आला आहे. त्यासाठी हार घेऊन दोन क्रेन रस्त्यावर सज्ज झाली आहेत. हिंगोली शहरात रॅलीच्या पार्श्वभूमीवर भव्य तयारी पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन या रॅलीला सुरुवात होणार असून, हिंगोली शहरातून ही रॅली निघणार आहे.