Manoj Jarange Shantata Rally : मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचा नाशिकमध्ये समारोप
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManoj Jarange Shantata Rally : मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचा नाशिकमध्ये समारोप
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्यभरात शांतता रॅली (Shantata Rally) काढली आहे. मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा आज नाशिकमध्ये (Nashik) समारोप होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचे राजकारण (Maharashtra Politics) सध्या चांगलेच तापले आहे. मराठा समाजाला ओबीसीतून (OBC) आरक्षण मिळावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केली आहे. तर मनोज जरांगेंच्या मागणीला ओबीसी नेत्यांनी कडाडून विरोध केला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मनोज जरांगे पाटील यांच्या अनेकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संघर्ष झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे मनोज जरांगेंची शांतता रॅली नाशिकमध्ये येत असताना पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जात आहे.