Manoj Jarange on Election Commission : पुढील अंमलबजावणीपर्यंत निवडणूका घेऊ नका - मनोज जरांगे

Continues below advertisement

Manoj Jarange on Election Commission : पुढील अंमलबजावणीपर्यंत निवडणूका घेऊ नका - मनोज जरांगे  २४ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा भगवं वादळ उठणार आहे.. ना मुंबई, ना पुणे.. तर मराठ्यांचं आंदोलन, राज्यभर.. रस्तोरस्ती.. शेत शिवारात असणार आहे.. राज्य सरकारने १० टक्के मराठा आरक्षण दिलं असलं.. तरी मराठ्यांना ओबीसीमधून सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्यासाठी, मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलंय.. त्यांनी शिंदे सरकारला दोन दिवसांचा अवधीही दिला आहे.. पण सरकारने त्वरीत हालचाल न केल्यास.. या वेळी ना उपोषण... ना गावबंदी... त्यांनी तर थेट प्रत्येक गावात, आपल्या मालकीचा रस्ता अडवण्याची हाक मराठा समाजाला दिली आहे.. केवळ एवढंच नव्हे तर, जोवर सगेसोयऱ्याची अंमलबजावणी होत नाही.. तोवर निवडणुकाच न घेण्याची विनंतीही निवडणूक आयोग आणि राज्य सरकारला केलीय...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram