ABP News

Manoj Jarange : धनंजय मुंडेंसोबत शेती आणि आरक्षणावर चर्चा झाल्याची माहिती

Continues below advertisement

Manoj Jarange : धनंजय मुंडेंसोबत शेती आणि आरक्षणावर चर्चा झाल्याची माहिती 

केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) मुंबईत मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत सीजीएसटी लाचखोर अधीक्षकासह दोघांच्या सीबीआयकडून लाच घेतल्या प्रकरणात मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. या प्रकरणात अधिकाऱ्यांनी लाच मिळवण्यासाठी टोळीच केल्याचे दिसून येत आहे. सीबीआयकडून एका खासगी व्यक्तीसह तब्बल सात अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींना सीबीआयने न्यायालयात हजर केले असता सीबीआयच्या विशेष न्यायालयाने 10 सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.

60 लाखांची लाच मागितली, सहा आरोपी सीजीएसटीचे वरिष्ठ अधिकारी 

सीजीएसटीकडील प्रकरणात कारवाई न  करण्यासाठी तक्रारदाराकडे सीजीएसटी अधिकाऱ्यांनी 60 लाखांची मागणी केली होती. यामधील 30 लाख रुपये तक्रारदाराकडून हवालामार्फत देण्यात आल्याचे तपासात समोर आलं आहे.  या प्रकरणी सीबीआयने ८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून यातील सहा आरोपी हे सीजीएसटीचे वरिष्ठ अधिकारी आहेत. यामध्ये सीजीएसटीचे अतिरिक्त सह आयुक्त, सीजीएसटी आयुक्त, 4 अधीक्षक, 2 सनदी लेखापालासह एका खासगी व्यक्तींचा सहभाग असल्याची माहिती सीबीआयकडून देण्यात आली आहे. या लाच प्रकरणी सीबीआयने 9 ठिकाणी छापेमारी करत आरोपींविरोधात महत्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram