Manoj Jarange on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस खूनशी; मराठाद्वेषी - मनोज जरांगे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManoj Jarange on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस खूनशी; मराठाद्वेषी - मनोज जरांगे
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचा लढा देणारे आणि मराठा समाजाच्या इतर मागण्यासाठी सरकारला धारेवर धरणारे मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चाचपणी सुरू केली आहे. आज मनोज जरांगे हे पुण्यात आहेत, यावेळी ते बोलताना म्हणाले, निवडणूक लढविण्याबाबत पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांबाबत चर्चा झाली. पण निर्णय कोणताही झाला नाही. पुन्हा एकदा बैठक घेऊ आणि मग ठरवू की निवडणूक लढवायची की 288 पाडायचे. जेव्हा निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील तेव्हा आम्ही बैठक घेऊ आणि त्यामध्ये ठरवू काय करायचं ते, निवडणूक लढवण्याची वेळ आली तर मी सगळं उघड करेन. आताच आम्ही आमची रणनीती उघड करणार नाही, असंही जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी यावेळी म्हटलं आहे.