Manoj Jarange on Chhagan Bhujbal : जातीय वाद झाले तर भुजबळ जबाबदार - मनोज जरांगे
Manoj Jarange on Chhagan Bhujbal : जातीय वाद झाले तर भुजबळ जबाबदार - मनोज जरांगे मराठा आरक्षणाला विरोध करणं बंद करा, मग मराठे तुमच्या मदतीला येतील, कुणाच्या शापाने काय होतं हे थोड्याच दिवसात कळेल, मनोज जरांगेंचं छगन भुजबळांना प्रत्युत्तर मनोज जारांगे पाटील ऑन भुजबळ कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही लोकसभेत पडलेले सगळे एकत्र आले म्हणून जास्त खुश होऊ नका... पुढे टाईम आहे मराठी एक आहे... मराठा आरक्षणाला आजपासून तरी विरोध करणे बंद करा... मग मराठे तुमच्या मदतीला येतील, कुणाच्या शापाने काय होतं हे थोड्या दिवसात कळेल थोडे दिवस बाकी आहे वडीगोद्री गावातून भुजबळांनी केलेल्या टीकेला मनोज जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय.. लक्ष्मण हाके यांचं आंदोलन छगन भुजबळ यांनीच उभं केल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केलाय...
राज्यात जातीय दंगली झाल्या तर त्याला भुजबळच जबाबदार असतील असंही जरांगे पाटील म्हणालेत.. एकाचवेळी मराठा-ओबीसी आरक्षणाचा प्रश्न उभा राहिल्याने, राज्य सरकारची कोंडी झालीय.. पण प्राध्यापक लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनावरून मनोज जरांगेंनी राज्य सरकारवर टीका केलीय.. मनोज जरांगेंनी एबीपी माझाशी बोलताना.. राज्य सरकार जाणूनबुजून मराठा विरुद्ध ओबीसींमध्ये जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोप केलाय.. तसंच जर आरक्षणप्रश्नी, सगेसोयऱ्यावरून सरकारने मराठ्यांची फसवणूक केली तर, आगामी निवडणुकीत आम्ही तुम्हाला डुबवू असा इशाराही जरांगेंनी दिला...