Manoj Jarange Pune Rally : मनोज जरांगेंची पुण्यात रॅली; वाहतुकीत बदल

Continues below advertisement

Manoj Jarange Pune Rally : मनोज जरांगेंची पुण्यात रॅली; वाहतुकीत बदल

राज्यात सध्या मराठा आरक्षणप्रश्न चांगलाच तापलेला दिसत असून दुसरीकडे विधानसभेसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून राजकीय घटनांना वेग आला आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोलापूरच्या दौऱ्यावर असताना कशाला हवंय आरक्षण या वक्तव्यामुळे चांगलाच वाद झाला असून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगेंनी प्रत्यूत्तर दिलंय. त्यांना नकोय आरक्षण. बाकीच्यांना हवंय की..असं जरांगे म्हणालेत.

राज ठाकरेंच्या गाडीवर सुपारी फेकणारी मंडळी कोण होती हे मी पाहिलं नाही. पण राज्यात कुठेही आंदोलन सुरु नाही. विनाकारण कोणी फडणवीसांसारखे सुपारी घेतल्यासारखं आंदोलन करणं, यात्रा काढणं बंद करा. आम्ही मुंबईला जाऊन जाब विचारू शकतो. समाजात ताकद आहे. आंदोलन सुरु नाही.

गाड्या फोडणाऱ्यांच्या विचारानं थोडंच राज्य चालतं..

मनोज जरांगे यांच्याकडून उद्धव ठाकरे शरद पवार राजकारण करत असल्याचं राज ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या गाड्यांवर सुपारी फेकल्यानंतर दंगली होतील अशी शक्यताही वर्तवण्यात आली होती. त्यावर मनोज जरांगे म्हणाले, गाड्या फोडणाऱ्यांच्या विचारांना थोडंच राज्य चालतं. दंगली होणार नाहीत. आम्हाला कोणीही कोणत्या पक्षाचा आहे असं म्हटलं जातं. पण मराठा समाजाकडून राज्यात कोणताही आंदोलन सुरू नाही. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram