Manoj Jarange FULL PC : हाके, भुजबळांवर जोरदार निशाणा, मराठ्यांनो एकत्र या; जरांगेंचे आवाहन

Continues below advertisement

Manoj Jarange FULL PC : हाके, भुजबळांवर जोरदार निशाणा, मराठ्यांनो एकत्र या; जरांगेंचे आवाहन

Manoj jarange Patil on Chhagan Bhujbal : ओबीसी आंदोलक आमचे विरोधकच नाहीत. तो येवलावाला काड्या करत आहे. लक्ष्मण हाकेंना (Laxman Hake) भुजबळांनीच उभे केले आहे. ओबीसी आंदोलनाला भुजबळच सगळे पुरवत आहेत. तुमचे राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केले तर नाव बदलेन, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांना आज डिस्चार्ज मिळाला होता. मात्र त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.   यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की,  मी डिस्चार्ज घेतला होता, बीडला जाऊन आलो. पण, तब्येत खराब झाली. त्यामुळे पुन्हा रुग्णालयात दाखल झालो. ओबीसींची चांगली मागणी आहे. त्यामुळे मराठा नेत्यांची डोळे उघडतील. ओबीसी नेते तुटून पडले आहेत. मराठ्यांच्या डोळ्यावर आलेली मस्ती आता उतरेल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram