Manoj Jarange on OBC : नागपूरचा मोर्चा राजकीय, तो स्वार्थासाठी- जरांगे पाटील
Continues below advertisement
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी नागपुरातील (Nagpur) ओबीसी मोर्चावर (OBC Morcha) सडकून टीका केली असून, विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि 'परळीच्या टोळी'वर (Parli Gang) गंभीर आरोप केले आहेत. 'नागपुरातील ओबीसींचा हा मोर्चा राजकीय मोर्चा असून तो स्वार्थासाठी काढला आहे,' अशी थेट टीका जरांगे पाटलांनी केली आहे. हा मोर्चा काँग्रेसचा (Congress) असून राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) सांगण्यावरून विजय वडेट्टीवार तो काढत असल्याचा आरोपही त्यांनी केला. १९९४ मध्ये शरद पवारांनी (Sharad Pawar) जे करायचे ते केले, आता मागचे उकरून काढण्यापेक्षा लढून हक्क मिळवण्यावर भर देणार असल्याचेही ते म्हणाले. 'परळीच्या टोळी'मुळे धनगर समाजाच्या आरक्षणाचे वाटोळे होत आहे, इतके जर ते समाजासाठी लढले असते, तर धनगरांना आरक्षण मिळाले असते, अशा शब्दांत त्यांनी मुंडे भावंडांवरही निशाणा साधला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement