Manoj Jarange Patil : आता फक्त पाडा म्हणालो, विधानसभेला नाव घ्यावं लागेल; मनोज जरांगे आक्रमक

Continues below advertisement

लोकसभा निवडणुकीत उतरलो नाही, मात्र आरक्षण मिळाले नाही तर, विधानसभेला पूर्ण ताकतीने संपूर्ण मराठा समाज विधानसभेला मैदानात उतरेल, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे. ते आज संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलत होते.

हे व्हिडिओ देखील पाहा

Sangli News: सांगलीच्या 'हंग' कॅफेत गुंगीचे औषध देऊन युवतीवर अत्याचार, कॅफेची तोडफोड

सांगली : सांगलीत (Sangli News) कॅफेत अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देत अश्लील व्हिडिओ तयार केले. त्यांनतर हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.  त्यामुळे कॅफेमध्ये गैरप्रकार होत असल्याचे पुन्हा समोर आले आहे. यानंतर  संतप्त झालेल्या शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांकडून  कॅफेची तोडफोड करायला सुरुवात केली. या प्रकरणाची आता संपूर्ण शहरात जोरदार चर्चा सुरु आहे. कॅफेमध्ये गैरप्रकार घडत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.

सांगलीत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून  कॅफेची तोडफोड करण्यात येत आहे. सांगलीतील  कॅफे हंग ऑन असे कॅफेत गुंगीचे औषध देऊन अत्याचाराची घटना घडली. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली. आज या घटनेचे पडसाद उमटले  आहेत. संतप्त शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांनी आज आक्रमक घेतला आहे. आज शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांनी तीन कॅफेची तोडफोड केली आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram