Jarange's Ultimatum: 'सरकारचे कपडे फाडावे लागतील', Manoj Jarange यांचा शेतकऱ्यांसाठी नवा लढा
Continues below advertisement
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आता आरक्षणा'नंतर' आपला मोर्चा शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वळवला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई न मिळाल्याने त्यांनी सरकारला धारेवर धरले आहे. 'आपल्याला रस्त्यावर आणून सरकारची कपडे फाडावी लागणार आहेत, त्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही', अशा शब्दात मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे. दसरा मेळाव्यात दिलेल्या अल्टिमेटमनंतर, दिवाळीनंतर आंतरवाली सराटी येथे तज्ञांची बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांच्या मते, केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी अचूक अहवाल पाठवण्याच्या प्रक्रियेमुळे भरपाईस विलंब होत आहे. या आंदोलनामागे केवळ शेतकऱ्यांचे हित आहे की राजकीय पेरणी, अशी चर्चा सुरू असतानाच, पुण्यातील सारसबागेतील (Sarasbaug) दिवाळी पहाटचा कार्यक्रम वादात सापडला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement