Manoj Jarange News : मनोज जरांगेंच्या हत्येचा कट? दोन आरोपींना अटक
Continues below advertisement
मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर त्यांच्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. 'त्यांना दारू पाजून हे प्लॅन केलंय सगळं', असा दावा अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी विवेक उर्फ दादा गरूड (Vivek alias Dada Garud) आणि अमोल खुणे (Amol Khune) या दोन आरोपींना अटक केली असून, त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी अमोल खुणे हा जरांगे यांचा समर्थक असल्याचं म्हटलं जात आहे, मात्र त्याच्या कुटुंबीयांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. दारूच्या नशेत हे सर्व घडवून आणल्याचा आणि आपल्या पतीला अडकवण्यात येत असल्याचा आरोप खुणे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. दुसरीकडे, धनंजय मुंडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशीची मागणी केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement