Manoj Jarange on Sharad Pawar : शरद पवार काय म्हणतात यापेक्षा माझं मन महत्वाचं

Continues below advertisement

Manoj Jarange on Sharad Pawar : शरद पवार काय म्हणतात यापेक्षा माझं मन महत्वाचं  राज्यात सध्या मराठा आरक्षणप्रश्न चांगलाच तापला असून या सर्व प्रश्नी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमीका स्पष्ट करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीवरून पुन्हा एकदा खळखळ केल्याचे दिसून आले. सरकारशी सध्या चर्चा नाही, सध्या सर्व बंद आहे. पावसामुळे इंटरनेट बंद आहे असं कारण देत यावेळी पुन्हा ड्रोन आल्यावर ते सरकारचे असतील असे समजावे असे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे म्हणालेत.  राज्यात मराठा आरक्षणप्रश्नी सुरु केलेले आमरण उपोषण तब्येतीच्या कारणामुळे स्थगित केल्यानंतर त्यांचे छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार सुरु होते. उपचार थंबवून आता ते आंतरवली सराटी येथे पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले.   शरद पवार काय म्हणतात यापेक्षा माझं मन... काल छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका मांडल्यानंतर मनोज जरांगे म्हणाले,शरद पवार काय म्हणतात त्यापेक्षा माझं मन ,आणि विचार ,संस्कार काय सांगतात ते महत्वाचे आहे. धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. बंजारा समाजाला वेगळा प्रवर्ग करण्याची मागणी आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram